Breaking
ब्रेकिंग

दत्त जयंती निम्मित गुरुदत्त मंदिरात रोज गुरुचरित्र पारायण – शुभम भोंग

0 3 9 0 3 2

दत्त जयंती निम्मित गुरुदत्त मंदिरात रोज गुरुचरित्र पारायण – शुभम भोंग

नगर /  प्रतिनिधी

नगर– मधील नगर पुणे रोडवरील ओढ्यातील गुरुदत्त मंदिर,गोंडाळ मळा,चास येथे दत्त जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रोज गुरुचरित्र पारायण होत असून तो दि १४ डिसेंबर पर्यंत होणार असून दत्त जयंतीला १४ डिसेंबर त्याची सांगता होणार आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी शुभम भोंग यांनी दिली .

पुजारी शुभम भोंग म्हणाले श्री गुरुचरित्र हा एकूणच दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे यामध्ये श्रीदत्त अवतारी श्रीगुरु विषयावर माहिती आहे गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री.रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली.कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.
गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण,दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले त्यात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीगुरू नृसिंह सरस्वती या दोन थोर अवतारी पुरुषांच्या कार्यामुळे दत्तोपासना सर्वत्र पोहोचली. त्यातील श्रीनृसिंह सरस्वतींचे कार्य फारच मोठे आहे.त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर,गाणगापुर,नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) यांना तीर्ह्क्षेत् माहात्म्य प्राप्त झाले आहे.श्रीगुरुचारीत्रात या दोन अवतारी पुरुषांचे जीवनकार्य, त्यांनी केलेले चमत्कार,त्यांनी केलेला अनेकांचा उद्धार,त्यांनी केलेला उपदेश इत्यादी अनेक कथा माध्यमातून आलेले आहेत. या ग्रंथाचे साप्ताह पारायण होते .
श्रीगुरुचरित्र ही कामधेनू आहे. तो कल्पतरू आहे. याच्या श्रवण-पठणाने अनेक फायदे होतात.या ग्रंथाच्या श्रवण-पठणाने गुरुकृपा प्राप्त होते.सर्व संकटाचा परिहार होतो. महापातकांचा नाश होतो. प्रयत्नांना यश येते.आरोग्यप्राप्ती होते.विद्याध्यायनात प्रगती होते.साधूसंतांचा सहवास लाभतो.घरातील वादविवाद नाहीसे होतात. संकटकाळी धैर्य येते. अशी भाविकांची श्रद्धा आहे मात्र त्यासाठी सदाचरण आणि श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे. असेही ते म्हणाले .

केडगावच्या पुढे असलेले हे दत्त मंदिर पुरातन क्षेत्र असून ओढ्यात असून दोन्ही बाजूने डोंगर आहे व मध्ये दत्तक्षेत्र आहे. त्यामुळे मंदिराला ओढ्यातील दत्त मंदिर असे नाव पडले आहे. दि १४ रोजी सकाळी ८ ते १२ पर्यंत श्रीं दत्तगुरूंचा महाअभिषेक सोहळा,नंतर दुपारी १२ ते ३ भजन कार्यक्रम व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री.प्रसाद महाराज देव,शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांचे एकनिष्ठ भक्त नरहर सिद्ध(दादास्वामी)यांचे १३ वे वंशज यांच्या मधुर वानिने श्री दत्त संगीत जन्म कथा व दत्त नामाचा नामजप होऊन सायंकाळी ठीक ६ वाजता श्रींचा पाळणा होऊन दत्त जन्म उत्सव साजरा होईल. दत्त जन्म झाल्या नंतर सायं ७ ते ९ भजन होईल.तसेच दिवसभर साबुदाणा खिचडी चा महाप्रसाद वाटप होणार आहे
दिनांक १५ डिसेंबर ला दुपारी १२ वाजल्या पासून सायंकाळी ५ वाजे पर्यंत महाप्रसाद संपन्न होणार आहे. तरी नगर पुणे रोड वरील गुरुदत्त मंदिर, गोंडाळ वस्ती,चास,अहिल्यानगर.येथे सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भाविक,भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे