Breaking
ब्रेकिंग

धुळे येथील बाजरी संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार प्रदान*

0 7 6 9 4 3

*धुळे येथील बाजरी संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार प्रदान*

राहुरी तालुका जावेद शेख

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली या ठिकाणी मंडोर, जोधपुर, राजस्थान येथील अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक तसेच हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्थेचे निदेशक डॉ. सी.तारा सत्यवती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय स्तरावरील 60 वी बाजरी संशोधन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एम. एल. जाट व पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव हे होते. या बैठकीच्या उपाध्यक्षस्थानी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील सहाय्यक महासंचालक डॉ. एस. के. प्रधान हे होते. या आढावा बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे येथील अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन केंद्राला सन 2024 – 25 या वर्षासाठी उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय, धुळे येथे अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या संशोधन केंद्रावर अखिल भारतीय स्तरावरील बाजरी पैदासशास्त्र, बाजरी कृषिविद्या आणि बाजरी वनस्पती विकृतीशास्त्र या विषयावरील संशोधनाचे काम करण्यात येते. या संशोधन केंद्राचे प्रमुख तसेच बाजरी पैदासकार डॉ. के. के. बर्हाटे, कृषिविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आर. टी. सूर्यवंशी, वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सी. एस. ठाकरे या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ तसेच कर्मचार्यांनी सन 2024-25 या वर्षात विविध प्रकारचे संशोधन प्रयोग, संशोधित केलेले विविध वाण, आदिवासी शेतकर्यांसाठी आदिवासी उपयोजना व शेतकर्यांच्या शेतावर प्रथम आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात आली. या उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल या संशोधन केंद्राला उत्कृष्ट संशोधन केंद्र या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे