वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य होणे गरजेचे-डॉ.राजेश बनकर
डायट मार्फत नवनियुक्त शिक्षक सेवाप्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम प्रशिक्षणास सुरुवात
प्रतिनिधी : जावेद शेख
देशाचे भवितव्य चार भिंतीच्या आत घडू शकते असे कोठारी आयोगात सांगितले आहेत आणि ते नवनियुक्त शिक्षकांनी समजून घेणे गरजेचे आहे उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी नवनियुक्त शिक्षकांनी १० सूत्रांचा अवलंब करण्याबाबत सखोल मार्गदर्शन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगरचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांनी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी सुमारे २०० नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालय अहिल्यानगर व शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर हे होते तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक अरुण भांगरे यांनी नवनियुक्त शिक्षकांना मार्गदर्शन केले. सात दिवसात सुलभकांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे सूक्ष्म प्रशिक्षण नियोजन केले आहे त्याचा फायदा विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी होऊन एक चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम व उत्कृष्ट शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षणाचा फायदा प्रशिक्षणार्थींना होईल असे प्रतिपादन वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता कैलास सदगीर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभक महेश पाडेकर यांनी तर आभार सुलभक संदीप वाकचौरे यांनी मानले.यावेळी संगमनेर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्तार अधिकारी त्रिभुवन, तज्ञ सुलभक सविता कचरे, संदीप वाकचौरे, महेश पाडेकर, सदानंद डोंगरे,अनमोल होन, प्रकाश पारखे, सुनील घोलप आदी उपस्थित होते.