Breaking
ब्रेकिंग

आधुनिक कांदा लागवडीत यांत्रिकीकरणाची नवी दिशा

कांदा लागवड आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने

0 8 6 6 9 3

*आधुनिक कांदा लागवडीत यांत्रिकीकरणाची नवी दिशा*

*कांदा लागवड आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने*

राहुरी तालुका जावेद शेख

कांदा लागवडीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मा. प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) व कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांनी एस. पी. अग्रो इनोव्हेशन्स – प्लांटोमॅट, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर येथे तयार करण्यात आलेल्या कांदा बियाणे पेरणी व रोप लागवड यंत्राची पाहणी करून मार्गदर्शन केले. त्यांनी या नवकल्पनेचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हे यंत्र श्री. सौरभ कदम आणि श्री. प्रसाद देशमुख यांनी मोठ्या परिश्रमातून आणि सखोल अभ्यासातून तयार केले आहे. या यंत्रासाठी पेटंट मिळाले असून आतापर्यंत 500 हून अधिक कांदा लागवड यंत्रांची निर्मिती झाली आहे. काही यंत्रे परदेशात निर्यात देखील करण्यात आली आहेत. सध्या 200 हून अधिक नवीन यंत्रांची निर्मिती सुरू असून, शेतकऱ्यांकडून वाढत्या मागणीमुळे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे.

श्री. प्रसाद देशमुख म्हणाले —

> “या यंत्राद्वारे कांदा रोप लावणी केल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी 3 ते 3.5 टन अधिक आणि दर्जेदार कांदा उत्पादन मिळते.”

या प्रकल्पाची सविस्तर माहिती श्री. शेखर भुजाडी यांनी दिली.

आदिदिशा सीड्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी *श्री. अंकुश दादा सोळंके* म्हणाले —

> “या यंत्राचा प्रचार आणि प्रसार कांदा बीजोत्पादन करणाऱ्या आदिदिशा सीड्स प्रा. लि. मार्फत करून राज्यभर आधुनिक कांदा लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. आमचे ध्येय आहे की महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राने कांदा शेती करावी.”

या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरी आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचून दर्जेदार कांदा उत्पादनात वाढ होणार आहे.

3.3/5 - (3 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे