Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलिस ठाण्यात दारू बंदी आदेश झुगारल्या मुळे १० अवैध दारू विक्रेत्यांना जामीन झालेल्या १० जामीनदारांच्या ७/१२ उताऱ्यावर एक लाख रुपयाचा बोजा

0 7 9 8 0 4

राहुरी पोलिस ठाण्यात दारू बंदी आदेश झुगारल्या मुळे १० अवैध दारू विक्रेत्यांना जामीन झालेल्या १० जामीनदारांच्या ७/१२ उताऱ्यावर एक लाख रुपयाचा बोजा

राहुरी पोलिस स्टेशन ची दारूबंदी साठी जिल्यातील वेगळी मोहीम

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन 2025 मध्ये एकूण 221 आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत 221 गुन्हे दाखल करण्यात आले होते सन 2026 मध्ये जानेवारीपासून मी अखेरपर्यंत एकूण 154 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मागील दीड वर्षांमध्ये एकूण 375 दाखल गुन्ह्यांपैकी तीन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध दारूबंदी अधिनियम चे कलम 93 अन्वये प्रतिबंधाच्या दृष्टीने एकूण 155 प्रस्ताव श्रीरामपूर प्रांत अधिकारी श्री किरण पाटील यांच्याकडे पाठवण्यात आलेले होते प्रतिबंधाच्या दृष्टीने 155 प्रस्तावांपैकी 121 प्रस्तावांमध्ये माननीय प्रांताधिकारी यांनी प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे प्रत्येक अवैध दारू विक्रेत्या व्यक्तीकडून बोंड घेतलेले होते सदर बोंड घेतल्यानंतर सदर अवैध दारू विक्रेत्याकडून परत दारू विक्री होणार नाही असे अभिप्रेत असताना 121 बॉण्ड घेतलेले आरोपींपैकी दहा अवैध दारू विक्रेत्यांनी परत दारू विक्री केली म्हणून राहुरी पोलीस स्टेशन ने सदर दारू विक्रेत्यांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून घेतलेले बॉण्ड रद्द करण्यासाठीचे प्रस्ताव पुनश्च श्रीरामपूर प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे पाठविले .सदर दहा आरोपींनी माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्या आदेशाचे उल्लंघन करत ब्रिच ऑफ बॉण्ड केल्याने माननीय प्रांताधिकारी साहेब यांनी प्रत्येकी एक लाख रुपये दंड भरण्याबाबत आदेशित केले होते . परंतु सदर आरोपींनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे सदर आरोपींचे जामीनदार
यांच्या सातबाराच्या उताऱ्यावर सदर दंडाचा बोजा चढवण्याबाबत आज दिनांक 2 जून 2026 रोजी आदेश पारित करण्यात आले आहेत.
बाँड उल्लंघन करणारे अवैध दारू विक्रेते व त्यांचे जामीनदार

1)कैलास रामचंद्र कुसमुडे रा. वांबोरी
जमीनदार =सतीश अण्णासाहेब ढवळे रा. वांबोरी
2)मोहन भागवत बोरुडे (बर्डे ) रा. कुरणवाडी ता. राहुरी
जमीनदार -काशिनाथ भागवत ढवान रा. कुरणवाडी ता. राहुरी
3)दिलीप अंबादास कुसमुडे रा. वांबोरी
जमीनदार -सचिन इंद्रभान गडाख रा. वांबोरी ता. राहुरी
4)काशिनाथ अंबादास चव्हाण रा. तांदुळवाडी ता. राहुरी
जामीनदार -जनार्दन बाबुराव हिवाळे रा. कोढवड
5)दीपक मधुकर पडघलमल रा.सत्रळ ता. राहुरी
जामीमदार -नवनाथ नारायण पिंपळे रा. सत्रळ ता. राहुरी
6)नितीन साहेबराव मुंनतुडे रा.गडदे वस्ती चिंचाळे ता. राहुरी
जामीनदार -संदीप गंगाधर कोळसे रा. गढदे आखाडा ता. राहुरी
7)नवनाथ जोतिराम वाघ. रा. जुना कनगर रोड राहुरी
जामीनदार -अनिता राजाराम पाटील रा. जुना कनगर रोड राहुरी
8)जनार्दन रंगनाथ पवार रा.मानोरी ता. राहुरी
जामीनदार -नीरज सुधाकर मेहेत्रे रा. मानोरी
9)माणिक चंद्रभान पवार रा.वळण ता. राहुरी
जामीनदार -राजेंद्र शंकर पवार रा. मानोरी ता. राहुरी

10)अशोक सूर्यभान गुंजाळ रा.देवळाली प्रवरा ता. राहुरी
जामीनदार -सुरेश सोन्याबापू साळुंके रा.गांधींवाडी ता. राहुरी

तरी राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की कोणत्याही आरोपीस जामीन होताना तो आरोपी जामिनाच्या अटी शर्तीचे पालन करेल याची दक्षता घ्यावी अन्यथा आपण दिलेल्या जामीनामुळे आपल्या सातबारावर शासन रक्कम वसुलीच्या बोजा चढवल्या जाऊ शकतो याची नोंद घ्यावी

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो मुम्मका सुदर्शन सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो यांचे मार्गदर्शनात रपोलीस निरीक्षक सो ठेंगे यांचे नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.
या कारवाईचा पाठपुरावा राहुरी पोलीस स्टेशन चे पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे,समाधान फडोळ, राजेंद्र जाधव , पोहवा सूरज गायकवाड, राहुल यादव , गणेश मैड, सचिन कोळी, वृषाली कुसळकर यांनी केला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे