क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. मुलींसाठी महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याने मूल्य परंपरेत चार भिंतीत अडकलेली महिला घराबाहेर पडली त्याचा परिणाम म्हणजे आज महिला अनेक महत्त्वाच्या पदावर काम करत आहेत.
यावेळी श्री संत सावतामाळी युवक संघ, सावता परिषद व माळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने व सर्व फुले प्रेमी यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या आठवणींना उजाळा देत पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी अशोकराव तुपे, दिपक साखरे, सुनील शिंदे, सोमनाथ कुऱ्हे, आदिनाथ बनकर, अरुण गाडेकर, रमेश राऊत, पांडुरंग पटारे आदी फुले प्रेमी उपस्थित होते.