महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ,अलिबाग तालुक्यातील शिक्षकांचे मा.जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ,अलिबाग तालुक्यातील शिक्षकांचे मा.जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
आज दिनांक १७ मार्च २०२५ वार सोमवार रोजी राज्य संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात अलिबाग तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शासनाकडून वेळोवेळी आश्वासन देऊनही मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे राज्य संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी मा. श्री. जावळे साहेब यांना निवेदन दिले. यामध्ये प्रामुख्याने १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या तसेच नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देणे,१०,२०,३० वर्षाची आश्र्वासित प्रगती योजना त्वरित लागू करणे,निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे इत्यादी मागण्यासह इतर १५ अशा एकूण जवळपास २० मागण्या पत्राद्वारे देण्यात आल्या.
या प्रसंगी रायगड जिल्हा समन्वयक प्रा.श्री. निवांत केदार , रायगड जिल्हा सहसचिव प्रा.श्री. सचिन लोखंडे सर,अलिबाग तालुका अध्यक्ष प्रा.श्री. सोमेश्वर नागरे सर, प्रा.सौ.प्रज्ञा जाधव मॅडम व प्रा.श्री. सोनवणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली.