सीईओ मोरे यांनी कॅन्टोन्मेंटमध्ये आमूलाग्र बदल घडवले : डॉ. उद्धव शिंदे.
सीईओ विक्रांत मोरे यांना 'स्नेहबंध' तर्फे निरोप व शुभेच्छा...
सीईओ मोरे यांनी कॅन्टोन्मेंटमध्ये आमूलाग्र बदल घडवले : डॉ. उद्धव शिंदे.
सीईओ विक्रांत मोरे यांना ‘स्नेहबंध’ तर्फे निरोप व शुभेच्छा…
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी अर्जाची आवश्यकता राहिली नाही. पाणीपट्टी भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या तक्रारींचे केवळ तीन दिवसांत निवारण होते. असे आमुलाग्र बदल छावणी परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात कॅन्टोन्मेंटमध्ये घडवून आणले, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. छावणी परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांची बदली डिफेन्स इस्टेट ऑफिसर भुवनेश्वर (ओडिसा सर्कल) येथे झाल्याने त्यांना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी तिरंगा फ्रेम देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. सुनील कुमार उपस्थित होते. ‘स्नेहबंध’ चे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, जॉगिंग ट्रॅक, शाळा, आरोग्य यासह विविध दर्जेदार सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या. ऑनलाइन प्रणालीमुळे सेवा अधिक सुकर व पारदर्शक झाल्या. त्यासाठी सीईओ मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला .



