विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बसेस सोडाव्यात; छात्र भारती संघटना करमाळा च्या वतीने एस. टी. आगार प्रमुखांना लेखी निवेदन

विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बसेस सोडाव्यात; छात्र भारती संघटना करमाळा च्या वतीने एस. टी. आगार प्रमुखांना लेखी निवेदन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०८/ परांडा-स्वारगेट गाडीतून दि. 25/8/2026 रोजी विद्यार्थी खाली पडून जखमी झाला. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे येत असतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व शैक्षणिक कामासाठी बसची सुविधा खूप महत्वाची आहे. अशा परिस्थितीत त्यांना बसेसची सुविधा पुरवण हे महामंडळाचे काम आहे. या संदर्भात छात्र भारती करमाळा च्या वतीने करमाळा एसटी आगर प्रमुखांना लेखी निवेदन देण्यात आले.
शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेमध्ये गाड्या उपलब्ध नसतात. एखाद दुसरी गाडी आली तर त्यामध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस मध्ये चढ उत्तर करताना खूप त्रास होतो. त्यामध्ये काहींना इजा होते. कधी कधी जीवावरही बेतते. त्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी करमाळा आगार प्रमुखांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बसेस सोडाव्यात. जेणेकरून एसटी महामंडळाच्या कमी बसेसच्या अभावामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक, आर्थिक, मानसिक त्रास होणार नाही.

भविष्यात जर विद्यार्थ्यांना काही त्रास झालाच तर या सर्व टपरी एसटी महामंडळ प्रशासक जबाबदार असेल असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास किंवा त्यांना त्रास झाल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने संविधानिक मार्गाने निषेध नोंदवला जाईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन देते वेळी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी छात्र भारतीचे राज्य सदस्य सौरव शिंपी, करमाळा तालुका समन्वयक प्रसाद काळे, प्रणव जोशी उपस्थित होते.


