Breaking
ब्रेकिंग

जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल

0 3 9 0 3 1

जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल

प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :-जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब एस. डी. भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब जे. के. पाटील, समन्वय समिती अध्यक्ष यु. यु. दादा पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एच. जी. इंगळे, शिक्षक नेते संभाजीआप्पा पाटील, भाऊसाहेब आर. एच. बाविस्कर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण मुद्द्याबाबत पुढाकार घेण्यात आला.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी १०वी व १२वीच्या बोर्ड परीक्षांशी संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांच्या अंतरबदलाबाबत घेतलेला निर्णय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुकूल नाही, असे मत व्यक्त करून या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नाशिक विभाग शिक्षक आमदार माननीय श्री किशोरभाऊ दराडे, नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजितदादा तांबे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जयंत आसगावकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे व शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी जळगाव जिल्हा ज्युनिअर शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे, जळगाव माध्यमिक पतपेढीचे उपाध्यक्ष जे. पी. सपकाळे, जळगाव पतपेढीचे संचालक व मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे (ता. धरणगाव) श्री रविंद्र चव्हाण सर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

या निर्णयाच्या रद्दबाबत सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांच्या हितासाठी घेतलेली ही भूमिका शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे