आंतरशालेय राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋचा बोगा हिची सुवर्ण भरारी
आंतरशालेय राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत ऋचा बोगा हिची सुवर्ण भरारी
प्रतिनिधी . संजय वायकर
अहिल्यानगर : (पिंपरी चिंचवड) पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित आंतरशालेय राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२४ घेण्यात आली. या स्पर्धेत नगर येथील (१४ वर्ष खालील मुली ) ऋचा बोगा हिने ४४ किलो वजन गटात🏅सुवर्ण पदक मिळवून अहिल्यानगरचे नाव उंचावले . तिच्या या सुवर्ण कामगिरीचे सामाजिक राजकिय सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
ऋचा बोगा हिची रायपूर छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .
प्रशिक्षक धोपावकर सर तसेच आईवडिलांचे सतत असणारे प्रोत्साहन आणि सर्वांचे आशिर्वाद यामुळेच सुवर्ण पदका पर्यंत मजल मारल्याचे ऋचाने सांगितले. भविष्यात पुढे भारताचे नाव उज्वल करून भारतासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने एस डब्ल्यु न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले .
ऋचा बोगा हिने सुवर्ण कामगिरी केली असून ती इयत्ता ८ वी मध्ये भाऊसाहेब फिरोदिया शाळेत शिकत आहे. ऋचाला राष्ट्रीय किर्तीचे प्रख्यात मार्गदर्शक आदरणीय प्रा. संजय धोपावकर सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर (नॅशनल कोच), सोनाली साबळे मॅडम तसेच राष्ट्रीय खेळाडू पै.गणेश लांडगे , पै.शुभम दातरंगे , विशाल मेहेत्रे ,अथर्व नरसाळे ,गणेश शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे .
ऋचा बोगा हिचे न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे सर, नगरसेवक धनंजय जाधव, प्रा. संजय धोपावकर यांनी विशेष कौतुक केले . तसेच प्रा. सुनिल गायकवाड, प्रा. कैलास करपे , राजेंद्र बोगा, राकेश बोगा, पल्लवी बोगा, निर्मला बोगा, अमर येमूल, ज्ञानेश्वर गालपेल्ली, प्रविण गालपेल्ली, कृष्णा गालपेल्ली आणि सर्व नातेवाईक व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .