Breaking
ब्रेकिंग

कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते : विक्रांत मोरे

दहावीत ९८ टक्के मिळवणाऱ्या वेदिकाचा स्नेहबंधतर्फे सत्कार

0 3 9 0 3 9

कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते : विक्रांत मोरे

दहावीत ९८ टक्के मिळवणाऱ्या वेदिकाचा स्नेहबंधतर्फे सत्कार

प्रतिनिधी : धीरज लांडगे

अहिल्यानगर – कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते, हे वेदिका राऊत हिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले. 

आई वडिलांच्या कष्टाचे चीज करीत जिद्दीच्या बळावर सीबीएससी बोर्ड (इयत्ता १० वी) ९८ टक्के गुण मिळवत तक्षशिला स्कूलमध्ये भिंगार येथील वेदिका गणेश राऊत हिने यश मिळवले. त्याबद्दल तिचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र, पदक, गुलाबपुष्प. पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे बोलत होते. याप्रसंगी वेदिकाचे वडील गणेश राऊत व आई अर्चना राऊत उपस्थित होते.

स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, वेदिका गणेश राऊत हिने दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर परिस्थितीवर मात करत तिने कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे