Breaking
ब्रेकिंग

अमळनेर येथील प्रसिद्ध यात्रा उत्साहात ; मात्र यात्रेला अवकाळी पावसाचा फटका

पुराचा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने नियोजन व मार्गदर्शन सुचना जारी करावी

0 3 9 0 4 0

अमळनेर येथील प्रसिद्ध यात्रा उत्साहात ; मात्र यात्रेला अवकाळी पावसाचा फटका

पुराचा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने नियोजन व मार्गदर्शन सुचना जारी करावी

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध यात्रा सध्या उत्साहात सुरू असताना अवकाळी पावसामुळे यात्रेतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती असते. आनंद घेण्यासाठी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा व लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.योग्य त्या मार्गदर्शन सुचनाने बोर्ड लावेवे कारण नागरीक यात्रेच्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर करतात.त्यावेळी चोर गैरफायदागा घेतात व चोऱ्या होतात. नागरिकांनी यात्रेत येताना काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण पुराच्या संभाव्य धोका आहे.प्रशासनाने तशा सुचना जारी केल्या आहेत.तसेच यात्रा संपल्याची गावात अधिकृतपणे दवंडी देण्यात यावी, जेणेकरून गावकरी व भाविकांना याची स्पष्ट कल्पना राहील. अशा प्रकारे संभाव्य आपत्ती टाळता येईल व यात्रेचा अनुभव सुरक्षित होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे