Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजा विकणारे आरोपी वर गुन्हा दाखल

0 8 6 6 6 3

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजा विकणारे आरोपी वर गुन्हा दाखल

राहुरी तालुका जावेद शेख

‌पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कानिफनाथ चौक येथे प्रतिबंधित असलेला मांजा विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने दिनांक 27 /12/2015 रोजी सदर ठिकाणी छापा टाकून इसम नामे सचिन शांताराम क्षीरसागर वय ४३ राहणार कानिफनाथ चौक राहुरी याचे अनाधिकृत रित्या शासनाने बंदी केलेल्या नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आला आहे. त्याचे ताब्यात 7000 हजार रुपये किमतीचे रंगीबेरंही नायलॉन मांजाचे 14 बंडल मिळून आले आहेत.
सदर आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षणा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांच्या नेतृत्वात सपोनि सुदाम शिरसाठ,पोहेकॉ/सूरज गायकवाड, पोहेकॉ/राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल /नदीम शे, पोकॉ/भाऊसाहेब शिरसाठ, पोकॉ/अजिनाथ गिते राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कि कुणी शासनाची बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री, साठवणूक करताना मिळून आल्यास राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नावं गुप्त ठेवण्यात येईल.
श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क – 8483038953वर माहिती द्यावी .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे