Breaking
ब्रेकिंग

संविधान रक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २०२४ ” संविधान प्रसारक रावसाहेब घोडके यांना संविधान दिनी प्रदान

0 3 9 0 7 2

संविधान रक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २०२४ ” संविधान प्रसारक रावसाहेब घोडके यांना संविधान दिनी प्रदान

श्रीगोंदा / तालुका प्रतिनिधी – आदेश उबाळे

सम्यक संविधान ग्लोबल फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड शहर यांच्या मार्फत देण्यात येणारा ” संविधान रक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २०२४ ” रावसाहेब घोडके संविधान दिनी यांना प्रदान करण्यात आला .

श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर येथील रावसाहेब घोडके हे ३७ वर्ष कुकडी पाठबंधारे मध्ये नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवत फुले – शाहू – छत्रपती – आंबेडकर यांचे विचार संविधान विषयी जनजागृती, संविधानाने सर्वाना समान दिलेले अधिकार अशी विविध माहिती देत समाज प्रबोधन करीत सर्वसामान्यांना प्रबोधित करीत आहे
महापुरुषांचे फोटो दर्शनी भागावर त्यामध्ये संविधानाची उद्देशिका विविध सामाजिक संदेश सायकलीला साज देत फिरत समाज प्रबोधन करीत आहे. या कार्याची दखल घेत सम्यक संविधान ग्लोबल फाऊंडेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड शहर यांच्या मार्फत देण्यात येणारा ” संविधान रक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २०२४ ” रावसाहेब घोडके यांना संत गाडगेबाबा चौक संविधान शिल्प या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .
भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका, उपासक, बौद्धाचार्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन बरोबरच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे