Breaking
ब्रेकिंग

अतिक्रमण काढल्याने तो उध्वस्त झाला…उघड्यावर जगता जगता खाटेवरच जीव सोडला…त्याच्या दुर्दैवी मृत्यूने निसर्गही रडला

0 3 9 0 2 6

अतिक्रमण काढल्याने तो उध्वस्त झाला…उघड्यावर जगता जगता खाटेवरच जीव सोडला…त्याच्या दुर्दैवी मृत्यूने निसर्गही रडला

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : मी उघड्यावर आलो …तरी येथून हलणार नाही…येथीलच झाडाच्या लाकडात मला जाळा असे सांगत असतानाच त्याने उघड्यावर प्राण सोडले आणि काही वेळातच पावसाचे थेंब पडले जणू काही त्याच्या दुःखावर निसर्ग देखील रडला होता. ही दुर्दैवी कहाणी आहे अमळनेर येथील गांधीनगर मधील अतिक्रमण काढल्याने उध्वस्त झालेल्या धुडकू सुकलाल मराठे या वृद्धाची.काही दिवसांपूर्वी अमळनेर पालिकेने गांधीनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक कुटुंब उघड्यावर आले. पालिका अतिक्रमण धारकांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा कॉलनीत घरे द्यायला तयार आहे आणि अतिक्रमण धारक म्हाडा मध्ये जायला तयार नाहीत. त्यांना घरे मिळालेली नाहीत असा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे. हा वाद न्यायालयात पोहचला असून न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिल्याने अतिक्रमण काढलेला मलबा तसाच पडून आहे. अतिक्रमण धारक काही कुटुंब याच ठिकाणी उघड्यावर बस्तान मांडून आहेत. उन्हात दिवस काढायचा असाच नित्यक्रम धुडकू सुकलाल मराठे वय ७० याचाही होता.

पत्नी ,मुलगी ,नातू ,नातसून यांचे पालनपोषण बसस्थानक वर टपरी चालवून करत होते. दिवसभर ऊन चटके देत होते. गर्मी मुळे त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी धुडकू मराठे आजारी पडले. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना दवाखाण्यात नेऊ शकले नाही. तब्येत बिघडत चालली होती आजूबाजूचे लोक विचारपूस करायला आले असता धुडकू मराठे त्यांना मी येथून हलणार नाही. मेलो तरी चालेल मला याच ठिकाणी असलेल्या झाडाच्या लाकडात जाळा असे सांगत होते. आणि दगड मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या खाटेवरच ३१ मार्च रोजी रात्री साडे सात वाजेला जीव सोडला. काही वेळातच पावसाचे आगमन झाले. निसर्गाला देखील रडू आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे