आठ वर्षांत ९ हजारांवर लोकांना मदत करणाऱ्या ‘स्नेहबंध’ला नॅशनल अवॉर्ड
अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी स्वीकारला पुरस्कार
आठ वर्षांत ९ हजारांवर लोकांना मदत करणाऱ्या ‘स्नेहबंध’ला नॅशनल अवॉर्ड
अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी स्वीकारला पुरस्कार
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहिल्यानगर : गेल्या आठ वर्षांत समाज्यातील असहाय, निराधार, गरीब, जेष्ठ नागरिक, मजूर, गरीब मुले अशा जवळपास ९ हजार जणांना गरजू वस्तू, शैक्षणिक साहित्य, आरोग्य शिबिरांतून वंचित, यांच्यासाठी मदत करत असणाऱ्या व पर्यावरण संवर्धनासाठी १० हजारांवर झाडे लावणाऱ्या स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सामाजिक कार्यासाठीचा ग्लोबल ‘लीडरशिप नॅशनल अवॉर्ड’ २०२५ यांना पुणे येथे झालेल्या एका कार्यकमात प्रदान करण्यात आला.
पुणे येथील विमाननगर येथील शेरटॉन ५ माइल स्टोन येथे बॉलिवूड अभिनेते दीपक शिर्के, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते, तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, आयएचआरएओचे इंटरनॅशनल अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, ‘मी माझ्या सहकार्यांच्या वतीने नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा पुरस्कार स्वीकारतो. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर हि संस्था खऱ्या अर्थाने चालवली जाते. स्नेहबंध फौंडेशनद्वारे आम्ही ८ वर्षांत ९ हजारांहून अधिक लोकांना मदत केली आहे. स्नेहबंध कोणतीही अपेक्षा वा स्वार्थ न ठेवता सामाजिक उद्देशाने सामाजिक जबाबदारी पाडतो.



