सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उपक्रम ही काळाची गरज : आमदार जगताप

सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उपक्रम ही काळाची गरज : आमदार जगताप
स्नेहबंध फौंडेशन व पियुष डिजिटल कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती
अहिल्यानगर – येथील स्नेहबंध सोशल फौंडेशन व पियुष डिजिटल कार्यालयात श्री गणरायाचा गणेशोत्सव भक्तिमय आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो. स्नेहबंध सोशल फौंडेशन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. आजच्या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि समाजहिताचे कार्य हीच खरी काळाची गरज आहे.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांचा शाल व पुस्तक भेट देऊन सन्मान केला. उपस्थित भाविक व कार्यकर्त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व यशासाठी प्रार्थना केली.
यावेळी सुशीला शिंदे, रवींद्र शिंदे, राजश्री शिंदे, उद्योजक विलास शिंदे, निशांत पानसरे, संकेत शेलार यांच्यासह मित्रपरिवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


