Breaking
ब्रेकिंग

स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसाद करावे

स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसाद करावे - -प्रा. कैलास जाधव

0 8 6 5 3 1

स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसाद करावे – -प्रा. कैलास जाधव

 

आधुनिक भारताला एक आढळ स्थानापर्यंत पोहोचवणारे भारताला एक सामर्थ्य संपन्न स्थानापर्यंत रूपांतर करणारे अनेक राष्ट्रपुरुष आहेत,त्यामध्ये एक थोर राष्ट्रभक्त म्हणजे स्वामी विवेकानंद होय, वैश्विक एकात्मतेचा मूलमंत्र देणाऱ्या स्वामीजींनी संपूर्ण मानव जातीला जणू एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला.
संपूर्ण भारतीयांच्या आत्मविश्वासाचे दृष्टिकरण करत तरुणांना आधुनिक भारताचे स्वप्न दाखवत त्यांच्यातील दडलेल्या ऊर्जाशक्ती ला प्रज्वलित करणारे विचार प्रदान केले.
स्वामीजींमध्ये शोधक नजर, दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, परोपकारी वृत्तीचा ध्येयवाद व प्रखर राष्ट्रनिष्ठा इत्यादी गुणांचा परामोच्य खजिनाच होता.
ज्याचा उपयोग उज्वल भारताची पायाभरणी
दाखवण्यासाठी स्वामीजींनी संपूर्ण आयुष्य भर केला.
स्वामीजींनी देशातल्या विघातक ठरणाऱ्या असंख्य गोष्टीचा नायनाट करण्याच्या जणू प्रणच केला आणि युवकांना आपल्या अलौकिक तत्त्वज्ञानातून प्रभावित केले.
खरंच आजच्या युवकांना स्वामीजींच्या प्रत्येक विचाराचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून देशातील अनेक सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आग्रही असले पाहिजे.
कुठल्याही देशाचे उद्याचे भवितव्य हे तरुण व युवकांच्या हातामध्ये आहे असे म्हणतात. एवढी अफाट प्रतिभा लाभलेल्या स्वामीजींचे विचार वाचण्यापूरते, ऐकण्या पुरते मर्यादित न ठेवता युवकांनी त्याला आचरणात आणण्यासाठी खरी गरज आज निर्माण झाली आहे. मानवतेप्रती असलेले निसिम प्रेम, करुणा,आत्मीयता हा तर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वातला गाभाच होय.
स्वामीजी युवकांमधील कमी झालेल्या आत्मविश्वासाला उभारी देण्यासाठी संपूर्ण भारत भ्रमण करत सामान्यांच्या समस्या दुःख पाहून ते व्याकुळ होत. माझे देश बांधव अशा दुःखात खीतपत पडण्यापेक्षा त्यांनी आत्मसन्मानाने जगावे, यासाठी स्वामीजींनी अनेक युवकांना प्रेरित केले.
संघर्षणाला नवे बळ प्रदान करण्यासाठी त्यांनी स्वाभिमानाचे बीज युवकांच्या मनामध्ये रुजवले. आपल्या भारतीय अस्मितेची, संस्कृतीची नवी ओळख तरुणांच्या अंतर्मनात कोरवण्याचे महान कार्य केले.
स्वामीजींना आपल्या कर्तुत्वाच्या आधारावर उत्तमतेचे मानदंड उभे केले.
आज असंख्य आव्हाने युवकांना भेडसावत आहेत.
अफाट समुद्रासारखे व विशाल आकाशासारखे तत्त्वज्ञान आज उपलब्ध असूनही युवकांमध्ये उदासीनता दिसत आहे. याची कारणे असंख्य असतील परंतु त्यावर आजच अंतर्मुख होऊन उपायोजना शोधाव्या लागतील.
स्वामीजींनी युवकांना ध्येयवादी होण्यासाठी प्रोत्साहन दिले, आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करा. व्यसनापासून दूर राहा, एकात्मता ठेवा, सहकार्याची भावना वृद्धिंगत करा, द्वेष, कलह टाळा, सामाजिक बांधिलकी जपा, उद्बोधनातून समाज परिवर्तित करा, देशातील विघातक शक्तींना बळी पडू नका, अशा असंख्य गोष्टी आपल्या भाषणातून तत्त्वज्ञानातून ध्यानधारणा करा चित्त शुद्ध ठेवा युवकांपर्यंत पोहोचल्या.
आता युवकांनी हा वारसा चालवण्यासाठी भेदाभेद एकमेकांतील मतभेद विसरून ‘देश प्रथम ‘ या त्यागरुपी विचार करून आपली शक्ती एकवटून झटून देशाला सशक्त बनवण्याची संकल्पना उराशी बाळगली पाहिजे.
प्रसिद्ध मराठी कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात की, युवकांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा यासाठी आपल्यातील ऊर्जा शक्ती एकत्र करून असाध्य ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांच्यात पुन्हा एकदा अशा गोष्टी घडव्यात की भारत देशाला संपन्न राष्ट्राच्या शिखरावर पोहोचवता येईल. त्यांच्यात” पुन्हा एकदा चमका वीज उतरावी खाली भिणावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार,
पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक..
पुसून टाकीत भेदाभेद..
पुन्हा एक वेळ…
पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी.. दिगंतात.. पुन्हा एकदा..
आज तरुणांनी नोकरी,व्यवसाय शेती,उद्योग विविध कला, साहित्य संशोधन, अभियांत्रिक,सैन्यदल वैद्यकीय,इतर क्षेत्रात स्वतःच्या सामर्थ्याने कर्तुत्वाने, जिद्दीने चिकाटीने आपले ध्येय साध्य करून एक सशक्त उद्याची पिढी व उज्वल व समर्थ स्वाभिमानासाठी भारताचे स्वप्न साकार करून या विश्वात भारताला बलशाली बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. व आपल्या पुरुषार्थाने व सर्वार्थाने सत्याचा स्वीकार करावा.
स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी वंदन व युवकांना स्वामी विवेकानंद जयंती च्या खूप खूप शुभेच्छा.

प्रा. कैलास जाधव
लेखक व वक्ते
ज्ञानसंपदा स्कूल
अहिल्यानगर
9284641025

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे