Breaking
ब्रेकिंग

अरणगाव मध्ये रात्रीचा खेळ चाले,26 खडी क्रेशर मुळे होते शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान

0 7 6 9 4 3

अरणगाव मध्ये रात्रीचा खेळ चाले,26 खडी क्रेशर मुळे होते शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान

अहिल्यानगर / विशेष प्रतिनिधी : महेश कांबळे

येथील दौंड रोडवरील अरणगाव ,खडकी ,खंडाळा हद्दीमध्ये सुमारे २६ च्या वर खडी क्रेशर असून त्यातील काही रात्रीही चालतात. त्यामुळे फळ झाडाच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करता येत नाही ,धुळीमुळे सर्वच पिके खराब होत आहेत . मागील वर्षी फळबागांचे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले .काल रात्री गावचे सरपंच पोपट पुंड व ग्रामस्थांनी त्यांना रात्रीचे खडी क्रशर चालू नये अशी विनंती केली असता त्या विनंतीला न जुमानल्यामुळे रात्री ११ वाजता महसूल विभागाचे तलाठीसर्कल व तलाठी यांना बोलवून प्रत्यक्ष दाखवण्यात आले की रात्रीचे खडी क्रेशर या ठिकाणी चालू आहेत व त्यामुळे काय नुकसान होत आहे .

असे समजते की या ठिकाणी फक्त एकच क्रशरची जागा ही एन ए केलेली आहे .बाकीच्या सर्व शेत जमिनी आहेत .तसेच या क्रशरला शासकीय सर्व परवानगी आहेत का नाही ? त्यामुळे आज सर्कल व तलाठी यांनी तक्रार अर्जानुसार सर्व क्रेशर ची तपासणी केली , त्याचा अहवाल वरिष्ठांना एक-दोन दिवसात ते देणार आहेत असे समजते .

सरपंच पोपट पुंड यांनी पहाणी करायला आल्यानंतर रात्री बारा वाजता त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की खडी क्रेशर पासून शेतीचे नुकसान होत असून इथून उडणाऱ्या धुळी मुळे शेतीचे नुकसान होत आहे. अरणगाव तालुका नगर हद्दीतील त्यातील काही क्रशर दिवसा व काही रात्रीचे चालतात. आज रोजी रात्रीच्या वेळी काही खडी क्रशर चालू होती त्यामुळे मी सर्कल तलाठी यांना फोन केले म्हणून ते या ठिकाणी आले व या ठिकाणी त्यांनी रात्रीची मोठ्या प्रमाणावर ती धूळ पाहिली. तरी सर्व खडी क्रशरधारकांना आपण सूचित करावे की काही अरणगाव येथील खडी क्रेशर असतील त्यांची चौकशी करावी व आपण त्यांचे रात्री व दिवसाचे कोणाचे खडी क्रेशर चालू असतात त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे व सर्व अरणगाव येथील क्रशर मालकांची व त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करावी ही नम्र विनंती . त्यांच्या या अर्जानुसार आज खडी क्रशरचे कागदपत्राची व इतर तपासणी सुरू करण्यात आलेली आहे .

संबंधीत प्रशासन यावर काय कार्यवाही करणार ? खरेच कार्यवाही करणार का ? याकडे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे