राहुरीत अस्थिव्यंगा साठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप व वितरण शिबिराचे आयोजन
राहुरीत अस्थिव्यंगा साठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप व वितरण शिबिराचे आयोजन
राहुरी तालुका / प्रतिनिधी : जावेद शेख
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलीमको कानपूर व एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप योजनांतर्गत राहुरी येथे गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत नूतन कन्या विद्यालय राहुरी अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप शिबिराचे आयोजन माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घेण्यात येणार आहे.शिबिरामुळे अस्थिव्यंग, दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स तयार करून घेण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. या शिबिरासाठी येतानी आधार कार्ड, वैश्विक कार्ड (UDID), रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला याची सत्यप्रत तसेच छायांकित प्रत घेऊन येणे गरजेचे आहे. शिबिरास येतांना मदतनीस किंवा नातेवाईक सोबत घेऊन यावे. असे आवाहन मधुकर घाडगे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी तथा जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अहिल्यानगर,जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
. या कार्यक्रमात मा. श्री. आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा. श्री. प्रशांत गायकवाड, मा. डॉ. संजय घोगरे जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉ. दिपक अनाप व डॉ. अभिजित मेरेकर यांचा सहभाग राहणार आहे.



