Breaking
ब्रेकिंग

मनोज दादा जरांगे पाटील यांचा करमाळा तालुक्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही अफेवर विश्वास ठेवू नये:- मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे

0 7 6 9 4 5

मनोज दादा जरांगे पाटील यांचा करमाळा तालुक्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही अफेवर विश्वास ठेवू नये:- मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १८/ विधानसभेच्या रणधुमाळी मध्ये २ दिवसांवर मतदान आले असताना करमाळ्यामध्ये जरांगे पाटील यांची टीम येऊन रामदास झोळ यांना पाठिंबा दिला आहे अशी बातमी फिरत आहे. या अफेवर कृपया विश्वास ठेवू नये. रामदास झोळ यांनी श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे नाव वापरून किंवा कोणत्या तरी फेक टीमचे नाव वापरून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्याचा सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने जाहीर निषेध. श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वांना फार्म काढण्याचे आदेश दिले असताना श्री रामदास झोळ यांनी गद्दारी करून अपक्ष फॉर्म ठेवला आणि श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा आदेश डावलला या घटनेचा तीव्र निषेध करमळा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उमटला असताना झोळांना शरम कशी वाटली नाही की फेक टीमच्या नावाने बातमी देऊन स्वतःला पाठिंबा जाहीर करत आहेत ही बाब अतिशय निंदनीय आहे या बाबीचा जाहीर निषेध करत आहे असे सचिन काळे यांनी मत व्यक्त केले.

सकल मराठा समाज वरिष्ठ सोलापूर टीम यांच्याशी संपर्क केला असता त्या टीमकडून आमचे सर्वेसर्वा श्री माऊली दादा पवार यांना विचारणा केली असता त्यांनीही जाहीर निषेध केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितले श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची कुठलीही टीम कार्यरत नसून जे कोण भुरटे दादांचं नाव वापरत असेल त्यांना करमाळ्यामध्ये चोप द्या असे आवाहनही श्री माऊली पवार यांनी केले आणि अशा चुकीच्या फेक बातम्यांचा मी जाहीर निषेध करत आहे याची किंमत नक्कीच फेक बातमी करणाऱ्यांना मोजावी लागेल असाही इशारा दिला आहे असी माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी दिली.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे