१ मे महाराष्ट्र दिन ; १ मे च्या ग्रामसभेत विचारा हे प्रश्न

१ मे महाराष्ट्र दिन ; १ मे च्या ग्रामसभेत विचारा हे प्रश्न

१ मे या दिवशी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीने १ मे १९२३ रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामगार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र, १९८९ मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून मान्यता मिळाली.
१ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याच्या विभाजनापासून भारतातील महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन हा भारतातील महाराष्ट्र राज्यात एक राज्य म्हणून सुट्टी दिली जाते . महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये तयार झाली. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
१ मे रोजी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाजी पार्क, मुंबई येथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेड आयोजित केल्या जातात .
१ मे हा जागतिक कामगार दिन (Labour Day) म्हणूनही ओळखला जातो .
१ मे हा कामगार दिन म्हणून राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असून, तो कामगारांच्या संचलनांनी आणि निदर्शनांनी साजरा केला जातो.
हा दिवस महाराष्ट्र राज्याचा गौरव, मराठी संस्कृती आणि राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे .
१ मे ( महाराष्ट्र दिन ) रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करणे बंधनकारक आहे. हा दिवस राज्यात ग्रामसभेच्या अनिवार्य बैठकीच्या चार प्रमुख दिवसांपैकी एक आहे.
आर्थिक वर्षात किमान ६ ग्रामसभा होणे कायद्याने बंधनकारक असते .
१ मे रोजी ग्रामसभेत कोणते प्रश्न विचारले पाहिजेत ?
१) गावात नियमित पाणी पुरवठा का होत नाही ?
२) गावातल्या खराब रस्त्यांची दुरुस्ती कधी करणार ?
३) रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कधी होणार ?
४) ओढेनाल्या उपसा नियमित होत का नाही ?
५) गावात आरोग्य केंद्र दुर्लक्षित का आहे ?
६) मागील वर्षी किती निधी आला व तो कुठे खर्च झाला ?
असे प्रश्न गावकऱ्यांनी एकत्र येऊन विचारले पाहिजेत तेव्हा त्याचा जास्त प्रभाव पडतो आणि गावाच्या विकासासाठी हे खुप महत्वाचे आहे .


