Breaking
ब्रेकिंग

उजनी धरणावरील AI डेटा सेंटरविरोधी संघर्षासोबत न्यायालयीन लढाईही आवश्यक:- मनसे तालुकाध्यक्ष संजय (बांपू) घोलप 

0 8 9 9 6 5

उजनी धरणावरील AI डेटा सेंटरविरोधी संघर्षासोबत न्यायालयीन लढाईही आवश्यक:- मनसे तालुकाध्यक्ष संजय (बांपू) घोलप 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०६/ उजनी धरणावर येऊ घातलेल्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) डेटा सेंटरच्या विरोधात शेतकन्यांनी आणि स्थानिक जनतेने पुकारलेली रस्त्यावरील लढाई पूर्णपणे योग्यच आहे. मात्र, केवळ आंदोलनावर न थांबता याविरोधात न्यायालयीन लढाई लढणेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे मत मनसे करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी व्यक्त केले. “मैदानातील लढाईत जिंकलो आणि तहात हारलो, असा आपल्या राज्यांचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे केवळ आंदोलनाने हा प्रश्न सुटणार नाही, तर कायदेशीर आणि न्यायालयीन चौकटीत बाजू भक्कम मांडून हा लढा शेवटास नेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

या लढ्यात शेतकन्यांची बाजू भक्कम असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेतृत्व याविरोधात एकवटले आहे. आमदार रोहितदादा पवार, खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते आणि शुभचिंतक शेतकन्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

संजय घोलप पुढे म्हणाले की, “जेव्हा एवढे मोठे नेतृत्व आणि सर्वपक्षीय पाठबळ शेतकन्यांच्या बाजूने आहे, तेव्हा आपल विजय निश्चितच होणार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या लढ्यासाठी मैदानात उतरतील, त्यामुळे शेतकन्यांनी कोणत्याही परिस्थिती चिंता करण्याचे कारण नाही, कारण हा लढा आपण जिंकणारच असे मत संजय घोलप यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे