Breaking
ब्रेकिंग

दिपक ओहोळ बॅकेतुन सेवानिवृत्त होत असले तरी ते नागरिक संघटनेबरोबर कायमच राहतील….कन्हैयालाल देवी

0 3 9 0 3 0

दिपक ओहोळ बॅकेतुन सेवानिवृत्त होत असले तरी ते नागरिक संघटनेबरोबर कायमच राहतील….कन्हैयालाल देवी

करमाळा / विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

नागरिक संघटनेच्या अवतीभवती खंबीरपणे उभे असणारे माजी नगराध्यक्ष व अर्बन बॅकेचे वसुली अधिकारी दिपक ओहोळ यांची बॅकेतुन जरी सेवानिवृत्ती असली, तरी ते पुढील संपुर्ण आयुष्य नागरिक संघटनेच्या माध्यमातून, समाजसेवेत घालवतील, असा स्पष्ट व ठाम विश्वास नागरिक संगटनेचे नेते व करमाळा अर्बन बॅकेचे चेअरमन, कन्हैयालाल देवी यांनी व्यक्त केला आहे.
करमाळा अर्बन बँक येथे, अर्बन बँकेचे वसुली अधिकारी दिपक ओहोळ यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजीत निरोप संमारंभ कार्यक्रमात श्री.देवी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, माजी नगराध्यक्ष तथा संचालक अमोदशेठ संचेती, संचालक अभिजित वाशिंबेकर, बॅकेचे मॅनेजर प्रकाश क्षीरसागर,मकाईचे माजी संचालक तथा जेष्ठ पत्रकार विवेक येवले,पत्रकार सचिन जव्हेरी, विनायक चिवटे,अरूण माने,नगरसेविका स्वाती फंड,पुराणिक देवा,राजु साळी यांसह बॅकेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री.देवी म्हणाले की, दिपक ओहोळ हे फक्त बॅकेचे कर्मचारीच नव्हे तर माझे राजकीय सहकारी देखील आहेत. मी नेहमी त्यांचे सोबत बॅकेच्या अडीअडचणी,राजकीय घडामोडी यांसह सामाजिक विषयांवर हमेशा चर्च करायचो,अनेक निवडणुकीत त्यांनी मला मोलाची साथ दिलेली आहे. आणि भविष्यातही आता ते संपुर्ण वेळ, माझ्यासोबत राहतील यात शंका नाही असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी विवेक येवले,सचिन जव्हेरी,विनायक चिवटे,अरूण माने ,स्वाती फंड,एस.पी.कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना दिपक ओहोळ म्हणाले की,मी नौकरीच्या शोधात असताना मला अमोदशेठ संचेती यांनी, अर्बन बॅक परिवारात मला सामावून घेतले. आणि इथुन पुढे माझा अर्बन बॅकेच्या माध्यमातून, नागरिक संघटनेशी जवळचा संबंध येत गेला. मला मोठ्या विश्वासाने अर्बन बँकेच्या वसुली अधिकारी या पदावर, चेअरमन कन्हैयालाल देवी यांनी काम करण्याची संधी दिली. आणि हे करत असताना मला अमोदशेठ संचेती यांनी करमाळा नगर परिषद निवडणूक लढविण्याची सुचना दिली. आणि नागरिक संघटनेच्या माध्यमातून मी निवडणुकीत निवडून आलो,तद्नंतर जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी माझ्यावर विश्वास टाकत मला नगराध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली. व मी नगराध्यक्ष झालो. माझ्या जिवनातील प्रगतीच्या वाटेला वाट मोकळी करून देणारे, जयवंतराव जगताप,अमोदशेठ संचेती व कन्हैयालाल देवी हेच असल्याने, मी योग्य पध्दतीने वाटचाल करीत समाजसेवा केलेली आहे. आज पुन्हा एकदा ही अमोदशेठ व कन्हैयालाल देवी यांची जोडगोळी आता एकत्र येत आहे, त्यामुळे निश्चितच नागरिक संघटनेला खुप छान दिवस येतील यात शंकाच नाही. असे आपल्या जिवनातल यशस्वी वाटचालीचे श्रेय माजी आमदार जयवंतराव जगताप,अमोदशेठ संचेती व चेअरमन कन्हैयालाल देवी,नागेश कांबळे,सर्व पत्रकार व मित्र परिवार यांना देत आपल्या सेवानिवृत्तीच्या समारंभात दिपक ओहोळ यांनी सत्काराला उत्तर देवून सर्वाना भावूक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व्यवस्थापक प्रकाश क्षीरसागर यांनी केले तर आभार अमर करंडे यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे