आमदारांच्या मातोश्री प्रतिभाताई पाचपुते यांची जिल्हा परिषद शाळा दहिगावला सदिच्छा भेट

आमदारांच्या मातोश्री प्रतिभाताई पाचपुते यांची जिल्हा परिषद शाळा दहिगावला सदिच्छा भेट
नगर / विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सौ. प्रतीभाताई पाचपुते यांचा नगर तालुका दौरा होता दहिगाव श्री रामाचे दर्शन घेऊन गावातील प्रश्न अडचणी समस्या जाणून घेतल्या तसेच जिल्हा परिषद शाळेला दहिगाव सदिच्छा भेट देऊन चिमुकल्याशी संवाद साधला शालेय स्पर्धात तालुका, जिल्हा स्तरावर, ज्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत यश संपादन केले असे विद्यार्थीचा सत्कार सन्मान केला ते विद्यार्थी
सई गणेश म्हस्के , विराज वाघ यांना प्रतीभाताई पाचपुते यांनी या विद्यार्थ्यांना कौताची थाप सुध्दा दिली जिल्हा परिषद शाळा खरी क्रांतीकारक बदल घडवणारी शाळा आज पर्यंत ठरलेल्या आहेत पुढे घडत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन देखील केले व मुलांचा उत्साह वाढवला शाळेला अडचणी समस्या असतील त्या हक्काने सोडवू असा शब्द दहिगाव ग्रामस्थांना दिला.

यावेळी माजी सरपंच जयवंत शिंदे, लालासाहेब करपे, श्री राम ट्रस्ट चे कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर, विधितज्ञ पोपट म्हस्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश म्हस्के, श्रीका़त सावंत माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश म्हस्के, राहुल पोटरे,ह.भ.प आन्हाड महाराज,माजी सरपंच सुरेखा म्हस्के,रवी पोटरे, रावसाहेब जावळे, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख,गोरख बनकर,सेवा सोसायटी व्हाइस चेअरमन दत्तात्रय बनकर, श्री राम हायस्कूल मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, मदन गांगडेॅ, सुरेश झांबरे, निलेश पोटरे, हरीभाऊ हिंगे,अशोक हिंगे, मच्छिंद्र म्हस्के,अमीर शेख,अशोक जावळे,आदी मान्यवर उपस्थित होते.



