Breaking
ब्रेकिंग

नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0 3 9 0 2 7

नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

एस डब्ल्यू न्यूज / प्रतिनिधी

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील नमो बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केडगाव येथील महिला बचत गट आणि इतर महिलांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मोफत ट्रेनिंग देण्यात आले . यासाठी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर यांचे विशेष सहकार्य लाभले . केडगाव येथील काही महिला या बचत गटाच्या माध्यमातून नमो बहुउद्देशीय संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत . संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमातला एक भाग म्हणून महिलांना त्यांच्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले . कच्च्या माला पासून पक्का माल बनविणे त्या मालाची मार्केटिंग, पॅकिंग, ब्रँड तयार करणे तसेच इतरही विषयावर चर्चा झाली .

यावेळी नमो संस्थेच्या सचिव पुनम कानडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांचे व्यवसायाशी निगडीत अनेक प्रश्न असतात . त्यांना व्यवसाय सुरू करता येतो परंतु त्याचे मार्केटिंग माहित नसते तेव्हा या अडचणी सोडविण्याकरिता आम्ही नेहमी व तात्काळ मदत करू . त्यासाठी महिलांनी संपर्क साधावा .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष पत्रकार डॉ .श्री .संजय वायकर, संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते . अनेक बचत गट आणि महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे