Breaking
ब्रेकिंग

“स्थानिक खरेदी केली, तरच स्थानिक प्रगती घडेल : डॉ. उद्धव शिंदे

0 7 6 9 4 3

“स्थानिक खरेदी केली, तरच स्थानिक प्रगती घडेल : डॉ. उद्धव शिंदे

स्नेहबंध फौंडेशनचा उपक्रम

प्रतिनिधी :  संवेद वायकर

अहिल्यानगर – स्थानिक व्यवसाय मजबूत झाला, तर शहराचा विकास आपोआप होतो. मोठ्या ब्रँडच्या मागे धावण्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या मेहनती लोकांना संधी दिली, तर समाजाची खरी प्रगती होईल, असे मत स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केले.

डॉ. शिंदे यांच्या कल्पनेतून “स्थानिक खरेदी – स्थानिक प्रगती” या संकल्पनेवर आधारित जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत शहरातील विविध दुकाने, सेवा केंद्रे आणि व्यावसायिक ठिकाणी खालील घोषवाक्यांवरील पोस्टर्स लावण्यात आले.

“आपलं शहर, आपला अभिमान”, “स्थानिकांना साथ द्या – भविष्य घडवा” आणि “आपला पैसा – आपल्या माणसांसाठी”, असे छोटे फलक दुकानात लावण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश स्थानिक उत्पादक, व्यापारी आणि सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे.
यावेळी साई ट्रॉफीचे संचालक सचिन पेंडुरकर, स्वयंम बास्कर, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे