Breaking
ब्रेकिंग

अभिजीत दातार यांची परशुराम हिंदू सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

0 3 9 0 5 2

अभिजीत दातार यांची परशुराम हिंदू सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती

अलिबाग /  प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित दातार यांची परशुराम हिंदू सेवा संघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परशुराम हिंदू सेवा संघ
प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी दातार यांना तसे नियुक्तीपत्र दिले आहे.

परशुराम सेवा संघ महाराष्ट्र हिंदु समाजाच्या सर्वागीण उत्कर्षासाठी कार्य करत आहे या कार्यात आपण सक्रिय योगदान देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार आपली या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती तीन वर्षांसाठी असुन संघटनेच्या धोरणांना अनुसरून आपणांस पुढील काळात कार्य करायचे आहे, त्यासाठी आपण तन मन धनाने कार्य कराल अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करन्यात आली आहे. आपल्या नेमणुकीचा कालावधी तीन वर्षांकरिता असेल हिंदु समाजबांधवांना अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडो अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अभिजीत दातार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे