Breaking
ब्रेकिंग

नागपंचमी निमित्त नायलॉन मांजाची विक्री करू नये….पो. नि. रणजीत माने

विक्री करणाऱ्या दुकानदारवर गुन्हा दाखल

0 7 6 9 4 3

नागपंचमी निमित्त नायलॉन मांजाची विक्री करू नये….पो. नि. रणजीत माने

विक्री करणाऱ्या दुकानदारवर गुन्हा दाखल होणार 

करमाळा / विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी

करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील सर्व दुकानदारांनी सध्या नागपंचमी सुरू असल्याने, मोठ्या प्रमाणात पतंगाची व मांजाची खरेदी- विक्री केली जात असल्याने, दुकानदारांनी नायलॉन मांजाची विक्री करू नये, विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा सुचना करमाळा पोलीस स्टेशनच्यावतीने देण्यात आल्या असून करमाळा शहरातील तसेच करमाळा तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरापासून दूर ठेवावे असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

यासंदर्भात करमाळा पोलीसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका किराणा दुकानावर कायदेशीर कारवाई केलेली असल्याने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागपंचमी असल्याने लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत पतंग उडविण्याचा आनंद घेण्यात येत असतो. नव्हे हा पतंग उडविण्याचा मोह आवरणे कठीण काम आहे. पतंग शौकिनांमध्ये,पतंग पंचमी दिवशी आपापल्या छतावर म्हणा अगर मित्र परिवारासोबत म्हणा पंतग उडविण्याचा आनंद घेतला जातो. परंतु पूर्वी साध्या दोऱ्याचा मांजा बनवून उठविण्यात येत होता,परंतु त्याची जागा आता नायलॉन मांजाने घेतली असल्याने हा मांजा मानवी-पक्षी-प्राणी यांच्या जीविताला धोकादायक बनला असून यामुळे अनेक अपघातही होत आहेत. त्यामुळे हा मांजा लोकांनीच स्वतःहून वापरणे बंद करणे गरजेचे बनले आहे.आणि त्याच अनुषंगानेच करमाळा पोलीसांनी कानाड गल्ली करमाळा येथील किराणा दुकानावर केलेली नायलॉन मांजा विक्रीची कारवाई स्वागतार्ह बाब असल्याचे मत नागरिक व्यक्त करित आहेत.

दिनांक 20/7/2025 रोजी कानाड गल्ली करमाळा येथील तांबोळी किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात सादिक युसुफभई तांबोळी यांनी महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा निर्मिती-विक्री-साठवणूक थांबवावी बाबत प्रतिबंधित आदेशित केलेले असताना देखील त्याने आपले किराणा दुकानामध्ये प्रतिबंधित असलेला पतंग उडविण्याचा 5600 रूपये किंमतीचा मोनो RTC कंपनीचे एकुण 16 नायलॉन मांजाचे रोल प्रत्येकी 350 रूपये प्रमाणे नायलॉन मांजा विक्री करीत तसेच साठवणूक करित असताना मिळुन आला आहे तसेच सार्वजनिक उपद्रव थांबवण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक उपद्रव केला. गुरांना,पक्षांना,व मानवी जिवितास तीव्र इजा होण्याचा धोका निर्माण केला म्हणून करमाळा पोलीसांत गुरनं. 591/2025 बी.एन.एस.कलम 223 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5,15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो.हे.काॅ.पाडुरंग आरकिले,पो.काॅ.मिलिंद दहिहंडे,बापूसाहेब कोकाटे यांचे पथकाने केली आहे….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे