संग्रामदादा कोते पाटील यांची विधानपरिषद सदस्यपदी नेमणूक करा
शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साईबाबांना प्रार्थना

संग्रामदादा कोते पाटील यांची विधानपरिषद सदस्यपदी नेमणूक करा
शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साईबाबांना प्रार्थना
प्रतिनिधी : राहूल फुंदे
शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिर्डी शहराचे भूमिपुत्र मा. श्री. संग्राम दादा शिवाजीराव कोते पाटील यांची विधानपरिषद सदस्य पदी नेमणूक करण्यात यावी याकरिता शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साईबाबांना प्रार्थना व गुरुस्थान स्थान मंदिर येथे आरतीच्या वेळेस प्रदक्षिणा करून साईबाबांना साकडे घातले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिडी शहराध्यक्ष दीपक गोंदकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश भाऊ शिंदे अमित शेळके मा उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते गंगाधर वाघ अनिल गोंदकर अंकुश राठोड अमोल सुपेकर लक्ष्मण झाडे महेश फटाकिया राहुल फुंदे मंगेश उगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळेस दीपक गोंदकर म्हणाले की , राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर आपल्या कामाचा ठसा उरणारे संग्राम भैया कोते पाटील यांना अजित दादांनी विधानसभेत संधी देऊन त्यांनी केलेले पक्षाचे काम कामाची दखल घ्यावी ही विनंती दीपक गोंदकर यांनी केली आहे त्यांनी यावेळेस केली साई बाबांना देखील त्यांनी प्रार्थना केली आहे घातला आहे .