न पा शाळा क्र .3 कुर्डूवाडी येथे राज्यस्तरीय ATS परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न
न पा शाळा क्र . 3 कुर्डूवाडी येथे राज्यस्तरीय ATS परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न
एस डब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट
राष्ट्रमाता जिजाऊ न पा शाळा क्र . 3 कुर्डूवाडी येथे सोमवार दि . 4 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय एटीएस या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कुर्डूवाडी शहरातील समाजसेविका सोनिया गोरे आणि योगेश्वरी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सोनिया गोरे आणि योगेश्वरी गोरे यांचेकडून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.
मागील वर्षी एटीएस परीक्षेला या शाळेचे 12 विद्यार्थी बसले होते.ते सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले तर त्यापैकी 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले.यामध्ये प्रणाली योगेश महिंगडे, १ली (राज्यात 15 वा,जिल्ह्यात 12 व केंद्रात 6 वा),श्रद्धा महेश घोणे,2 री(जिल्ह्यात 20 वा,केंद्रात 5 वा ), जोया मन्सूर शेख,3 री(जिल्ह्यात 42 वा, केंद्रात 15 वा) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक गौरव करण्यात आला.उर्वरित सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वाती डोळसकर ,उपाध्यक्ष परवीन शेख, मुख्याध्यापक इंदुमती पाटील,महिला पालक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. खरी गुणवत्ता ही मराठी शाळेत पहायला मिळते.गोरगरिबांच्या शाळा टिकल्या पाहिजेत.इंग्रजी शाळेत आपले मूल घातले म्हणजे त्याला इंग्रजी भाषा येईलच असे नाही.असे मत शाळेचे उपशिक्षक पावले सर यांनी व्यक्त केले.तर मुलांशी पालकांचा संवाद हा मैत्रीपूर्ण आणि दररोज असावा.राग,चिडचिड किंवा नकारात्मक शब्द यामुळे मुले आपल्या पासून दूर होतात.मुलांना अभ्यासाबरोबरच मैदानावर रोज एक तास खेळायला सुद्धा पाठवणे गरजेचे आहे असे मत मिरगणे रेश्मा यांनी मांडले. ‘
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष पावले यांनी केले तर आभार प्रदर्शन मिरगणे रेश्मा यांनी केले.



