Breaking
ब्रेकिंग

राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्तीवर १२ फेब्रुवारी पासून श्रीसाईसच्चरित पारायण सोहळा

0 3 9 0 2 1

राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्तीवर १२ फेब्रुवारी पासून श्रीसाईसच्चरित पारायण सोहळा

राहुरी तालुका / विशेष प्रतिनिधी :  जावेद शेख

देवळाली प्रवरा परिसरातील चारी नंबर चार, चोथे वस्ती, राहुरी फॅक्टरी पेपरमिल रोड येथे सालाबादप्रमाणे यंदाही महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली तसेच बाबा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्यात दररोज सकाळी ८ ते ११ वाजता ग्रंथ वाचन, सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ वाजता प्रवचन, दररोज सकाळी ६, दुपारी १२, सायंकाळी ७ व रात्री १० वाजता बाबांची आरती होणार आहे.

संजय महाराज शेटे, सुभाष महाराज विधाटे, उदय महाराज घोडके, आबा महाराज कोळसे, बाबासाहेब महाराज वाळुंज, संजय महाराज म्हसे, बाबा महाराज मोरे हे आपली प्रवचन निरुपण करणार आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका होईल. सकाळी ९ ते ११ वाजता उध्दव महाराज मंडलिक यांचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यात व्यासपीठ चालक साई भक्त श्रीनिवास सहदेव असणार आहेत.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोथे वस्तीवरील नागरिक,गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी महिला भजनी मंडळ, जय मातादी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ यांच्या विशेष सहकार्याने व आदर्श नागरी सहकारी पतसंस्था व राहुरी फॅक्टरी यांचे सहकार्य लाभत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे