अमळनेरच्या विकास कामांकडे दिपक पाटील यांचे विशेष लक्ष*

*अमळनेरच्या विकास कामांकडे दिपक पाटील यांचे विशेष लक्ष*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथील सानेगुरुजी ची कर्मभूमी तथा संत सखाराम महाराजांच्या पतितपावन भुमी म्हणून प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे अमळनेर ची अशी अवस्था करताय तुम्ही अमळनेर नगरीच नाव नाही मोठं करू शकत तर नाव कमी तरी करण्यासाठी प्रयत्न करू करा.
दिपक पाटील वाघोदे ता. अमळनेर महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष खरंतर अमळनेर करांना आता कंटाळा आल्यासारखं चित्र स्पष्ट होत आहे. अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन कडे येत असल्याचं कळतंय विकासाचा वादा आणि दाखवण्यासाठी अशी काम केली जातात का असा प्रश्न येत आहे. याचा अर्थ असा पण होतो की आता काम मंजूर करता यावी तसेच ती करण्यासाठी ताकद न लावता तेच काम पूर्ण न करता नुसती लोकांची दिशाभुल केली जात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम करता येतच नाही.
मग तरी तुम्ही कशाला कामांना सुरुवात करावी.लोकांना चिखल मातीतून परी श्रम करावा लागत आहे. जिकडे तिकडे खड्डेच दिसत आहे. यंत्रणा उभी दिसते पण कम मार्गी का लावत नाहीत. जनता आता खुप त्रस्त झाली आहे. फक्त पक्ष मोठे करणं तुमचा हेतू नसावा तर काम पण प्रभावशाली असावीत.नुसती आशा लावल्याने काही होत नाही तर ती पूर्ण देखील झाली पाहिजे तर नागरीक सुद्धा पाठिंबा देतात.