Breaking
ब्रेकिंग

पेण प्रेस क्लब तर्फे संपादिका वंदना पाटील सन्मानित

जागतिक महिला दिनी कर्तृत्वान महिलेचा सन्मान

0 3 9 0 3 1

पेण प्रेस क्लब तर्फे संपादिका वंदना पाटील सन्मानित

जागतिक महिला दिनी कर्तृत्वान महिलेचा सन्मान

अलिबाग /  प्रतिनिधी : राजेश बाष्टे

संपूर्ण जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखणीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन संबोधला जातो. या दिनाचे औचित्य साधून पेण प्रेस क्लब तर्फे पेण मधील पत्रकार संपादिका वंदना पाटील कदम यांना सन्मानित करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणजे रायगड प्रेस क्लब आणि पेण प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील पत्रकार क्षेत्रातील कर्तृत्वान महिला तथा दैनिक रायगड वृत्तवेधच्या संपादिका वंदना प्रसाद पाटील-कदम यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात महिला पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे आपल्या लेखणीतून नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं. पत्रकारितेचा वसा घेत आपले कुटुंब सांभाळत पत्रकारितेचे काम एक महिला म्हणून त्यांनी उत्तम काम केलं.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी जेष्ठ पत्रकार सल्लागार बाळ सिंगासने, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, खजिनदार विजय मोकल, सचिव कमलेश ठाकूर, संतोष पाटील, सुनिल पाटील, नरेश पवार, प्रदीप मोकल, प्रकाश माळी, यभी तेरवाडकर, सूर्यकांत पाटील, रायगड वृत्तवेधचे उप संपादक गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे