समाधानी असावं, हेच खरे सुख आहे

=समाधानी असावं, हेच खरे सुख आहे=
================
> आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला सुखी व्हायचे आहे. मात्र सुखाची खरी व्याख्या प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. पैसा, संपत्ती आणि मोठेपणा मिळाला म्हणजेच सुख मिळते असे नाही.
. मनात समाधान असेल तर छोट्या गोष्टींतही मोठा आनंद मिळतो. आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत ओळखणे, हीच समाधानाची खरी सुरुवात आहे. सतत दुसऱ्यांशी तुलना केली तर मनाला कधीच शांतता मिळत नाही.
आयुष्यात गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यक आहे; पण पैशापेक्षा मनःशांती अधिक महत्त्वाची आहे. प्रेमळ माणसे, निरोगी शरीर, चांगले विचार आणि कुटुंबाची साथ यामध्येही खरे सुख दडलेले असते.
दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा आनंद घ्यावा. अपेक्षा कमी आणि कृतज्ञता अधिक ठेवली तर जीवन अधिक सुंदर वाटते. परिस्थिती कोणतीही असो, सकारात्मक विचार मनाला समाधान देतात.
एकंदरीत परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले असता प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सरांच्या मते
समाधान मनात असेल तर साधे जीवनही सुंदर वाटते; कारण समाधानी असावं, हेच खरे सुख आहे. आहे त्यात समाधान माना. जास्त अपेक्षा ठेऊ नका.^तृष्णा हेच मानवी दुःखाचे मूळ कारण आहे. म्हणून समाधानी असणे गरजेचे आहे.
प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
साकुरी. ता. रहाता. जिल्हा अहिल्या नगर
भ्रमण ध्वनी=९६०४७९७३१६


