Breaking
ब्रेकिंग

मतदानास आलेल्या जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची हेळसांड

0 3 9 0 4 0

मतदानास आलेल्या जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची हेळसांड

अलिबाग / प्रतिनिधी:-राजेश बाष्टे

अलिबाग जारह कन्या शाळेत जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी शासनाने केलेली व्यवस्था काहीही उपयोगी नाही .जे जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदान साठी गाडी रिक्षा मधून आले होते त्यांना त्यांच्या गाड्या गेट वर अडवून संबंधित सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणे कडून अडवण्यात आली . गेट वर उतरवून 90%दिव्यांग असलेले समीर सुरेश विलणकर याना यावेळी गेट वर उतरवण्यात आले व सांगण्यात आले की तुम्हाला व्हील चेअर देण्यात येईल . व्हीलचेअर आली ती पण मोडकी . जीला धड दोन पाय ठेवण्यासाठी व्यवस्था नव्हती त्यामुळे नेताना येताना आणि येताना समीरच्या पायाला दुखापत झाली .यावेळी काही कर्मचारी व पोलीस यांनी मंदत केली तसेच या वार्ड च्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर यांनी मदत केली या क्षणात माजी उपनगराध्यक्षा ऍड मानसीताई म्हात्रे यानी पण ही परिस्थिती पाहून संबंधित यंत्रणेला जरा आत मध्ये गाडी सोडायची होती ना असे सांगितले . पण सांगून पण इथेच उतरवले अशी तक्रार समीर च्या आईने केली असता ऍड .मानसी ताई यानी संबंधिताना चांगलेच खडसावले .जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगना नेण्या साठी असणारी व्हीलचेअर पुरवणाऱ्या संबंधित यंत्रणेवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई  करावी . व्हिडीओ शुटींग करण्यास मला मनाई आली .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे