Breaking
ब्रेकिंग

आधी मुहूर्त गणिताचे मग बहिणीच्या लग्नाचे

0 3 9 0 4 0

आधी मुहूर्त गणिताचे मग बहिणीच्या लग्नाचे

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर: रडावण येथील छोटू हसरत मरसाळे यांच्या मुलीचा दिपालीचा विवाह सोहळा ५ मार्च रोजी होता. दोन महिन्यांपूर्वीच लग्नाची तारीख, वेळ निश्चित झाली होती. बँड, मंडप, घोडा सर्व काही बुक झाले होते. आणि त्याच दिवशी दिपलीच्या भावाचा सागरचा दहावीचा गणिताचा पेपर होता “आधी लगीन गणिताचे मग बहिणीचे” म्हणत त्याने पेपर दिला आणि मग नवरीचा भाऊ म्हणून घोड्यावर बसला.नातेवाईक, पाहुणे मंडळी सारे उपस्थितीत होते. नवरी मुलगी दीपालीचा भाऊ सागर मरसाळे याचा दहावीचा पेपर होता.नवरीचा भाऊ आवश्यक आहेच. त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. एकीकडे बहिणीचं लग्न, तर दुसरीकडे करिअर घडवणारी परीक्षा. सागरने या परिस्थितीतही संयम राखला. त्याने आई-वडिलांना समजावून सांगितले की, परीक्षा देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुहूर्त एकाचवेळी मात्र सागरने स्वतःच्या आयुष्याचा मुहूर्त चुकू नये म्हणून गणिताचा पेपर देणे योग्य समजले.त्यामुळे त्याने १ वाजून दहा मिनिटांपर्यंत अमळनेर येथील धनदाई कॉलेजमध्ये जाऊन गणिताचा पेपर दिला आणि लगेचच लग्नासाठी रडावण गाठले. आणि नवरीचा भाऊ म्हणून घोड्यावर बसला आनंदाने लगीन पार पाडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे