Breaking
ब्रेकिंग

विविध मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचारी करणार आंदोलन

१६-१७ ऑक्टोबरला काळ्या फिती; ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

0 8 6 5 0 8

विविध मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचारी करणार आंदोलन

१६-१७ ऑक्टोबरला काळ्या फिती; ५ नोव्हेंबरला सामूहिक रजा, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

नगर – महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयांम ध्ये कार्यरत न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाने मंजूर करून ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. समान कामासाठी समान वेतनाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयीन कर्मचान्यांनी आता आंदोलनाची भूमि का घेतली असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी गट-क संघटना, लघुलेखक, बेलीफ महासंघ तसेच चतुर्थ श्रेणी महासंघ यांची एकत्रित बैठक महासंघाचे अध्यक्ष दादा निकम यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे पार पडली होती. या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानंतर अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची विशेष बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. बैठकीस अध्यक्ष अंकुश सांगळे, कार्याध्यक्ष शिरीष ढाळे, सचिव आनंद सोनपसारे, उपाध्यक्ष रवींद्र सूर्यपुजारी, आर. एन. गुंडू, आस्लम सय्यद, अजिनाथ पाडळकर, अतुल खरपुडे, बंडू बडे, सविता भालेराव, आर. डी. बेल्हेकर, डी. एस. परदेशी, अनिल निमसे, म्हाळसाकांत लिपाने, एस. एस. भालेराव, एस. एल. क्षिरसागर, वंदना केदार, अर्चना झिंजे, एस. एस. वाघ, व्ही. एच. खरात, सागर गायकवाड, प्रशांत खराडे, सुजित सानप, शिवाजी चांडोळे, अशोक जंगले, श्याम काठे, अमर तिवारी, ए. बी. मरकड, सुनील भाबड उपस्थित होते.

मागण्या मान्य न झाल्यास १६ सप्टेंबर तसेच १६ व १७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी एक दिवस सामूहिक रजा घेण्यात येईल. तरीही शासनाने मागण्या मान्य न केल्यास १७ नोव्हेंबरपासून सर्व न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा अंकुश सांगळे यांनी दिला.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष शिरीष ढाळे, बंडू बडे आणि सविता भालेराव यांनीही उपस्थित न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे