सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने “सायबर साथी” या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने “सायबर साथी” या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने “सायबर साथी” या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन होमगार्ड जवानांसाठी करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांनी सायबर सुरक्षेच्या विविध बाबतीत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सायबर फसवणूक, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, सोशल मीडियावर होणारे गुन्हे, फिशिंग, ओटीपी फसवणूक अशा अनेक प्रकारांबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच अशा घटनांपासून कसे सावध राहावे, याचे मार्गही सांगितले.
हा उपक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते आणि परिविक्षाधीन पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आला. यामध्ये अनेक होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला व सायबर सुरक्षेबाबतची मौल्यवान माहिती प्राप्त केली.