Breaking
ब्रेकिंग

संस्कृती संवर्धनच्या परीक्षेत, जय बजरंग च्या कु. श्रावणी पानकडे ला व चि.गणेश गिते ला सुवर्णपदक !

0 3 9 0 2 5

संस्कृती संवर्धनच्या परीक्षेत, जय बजरंग च्या कु. श्रावणी पानकडे ला व चि.गणेश गिते ला सुवर्णपदक !

एस डब्ल्यू न्यूज /   नेटवर्क

अहिल्यानगर दि. २८ /  आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित, जय बजरंग प्राथमिक विद्यालयाच्या कु. श्रावणी संतोष पानकडे. (इ . ४ थी ) व चि. गणेश बाबाजी गिते ( इ ७ वी) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई अंतर्गत, सन २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली सनातन भारतीय संस्कृती टिकण्यासाठी रामायण महाभारत तसेच संत मालिकेतील” संतकथा” या विषयांवर, स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती , सदर स्पर्धेमध्ये कु.श्रावणी संतोष पानकडे हिस ६० पैकी ६० गुण मिळाले , तर चि . गणेश बाबाजी गिते याला देखील ६० पैकी ६० गुण मिळाले, असून या दोघांनाही संवर्धिनीमार्फत” सुवर्णपदक” आणि “प्रमाणपत्र” देऊन संस्कृती संवर्धनीच्या अहिल्यानगर टीम मधील सदस्यामार्फत गौरविण्यात आले.

सदर यशस्वी विद्यार्थ्यांना, श्रीमती.आशा घुले मॅडम व श्री. राहुल मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी, संस्कृती संवर्धनच्या सहसेविका पल्लवी जोशी मॅडम, कल्पना गोगटे म मॅडम, शैलेंद्र गांधी सर, कल्पना वायकुळे मॅडम ,रजनी ढोरजे, मॅडम दीपा जानवे मॅडम , मीरा बेल्हेकर मॅडम ,आशालता बेरड, मॅडम राजश्री तट्टू मॅडम, उपस्थित राहुन बक्षीस वितरण केले ! ! तर  यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.नरेंद्रजी फिरोदिया सर तसेच विद्यालयाचे सहसचिव उमेशजी गांधी सर ,व्यवस्थापक श्री. आशुतोष घाणेकर सर तसेच जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर यांनी पुढील वाटचालीसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. शितल मोरे मॅडम यांनी केल ,तर श्रीमती.अश्विनी बेरड यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे