शबनम शेख बेस्ट टीचर अवॉर्ड च्या मानकरी
शबनम शेख बेस्ट टीचर अवॉर्ड च्या मानकरी
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा : जावेद शेख
राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगाव येथील प्रसाद फाउंडेशन संचलित डॉ.सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज येथे 12 वी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्या प्रसंगी आणि बेस्ट टीचर अवॉर्ड -2025 ने गौरविण्यात आले.
12 वी ची विद्यार्थीनी कु.शबनम युनूस शेख हिस बेस्ट टीचर अवार्ड -2025 देऊन गौरविण्यात आले यावेळी अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती राहुरीचे पोलीस निरीक्षक श्री.संजय ठेंगे हे होते.अध्यक्ष स्थान डॉ. सुभाष बन्सी काकडे यांनी स्वीकारले प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे राहुरी चे गट शिक्षणाधिकारी श्री. मोहिनीराज तुंबारे होते.तसेच बाबाजान शेख ( फ़ॉरेस्ट डिपार्मेंट ),आबासाहेब काळनर, बाळासाहेब खेमनर,माने सर, काकडे सर, प्रा.संभाजी माने सर, गागरे सर,रोकडे मॅडम, चांगदेव काकडे सर,प्रा. दिघे सर,प्रा. तांबे सर, प्रा. खळदकर सर, प्रा. नलगे सर, प्रा. बुळे मॅडम आदी मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.