ब्रेकिंग
अभिरूप न्यायालय स्पर्धेत न्यू लॉ कॉलेजच्या संघाला द्वितीय पारितोषिक
0
3
9
0
6
5
अभिरूप न्यायालय स्पर्धेत न्यू लॉ कॉलेजच्या संघाला द्वितीय पारितोषिक
एस डब्ल्यु न्यूज / रिपोर्ट
नगर : पुणे येथील मॉडर्न लॉ कॉलेज यांनी अभिरूप न्यायालय स्पर्धा आयोजित केली होती . यात विविध जिल्ह्यातून लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . यात विद्यार्थ्यांचा उत्साह कौतुकास्पद होता .
मॉडर्न लॉ कॉलेज यांनी आयोजित केलेल्या अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये अहिल्या नगरच्या न्यू लॉ कॉलेज संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले .
न्यू लॉ कॉलेजचे विद्यार्थी मेहिका अनारसे बी.ए.एलएल. बी. चतुर्थ वर्ष आणि सना खान. बी ए एल एल बी द्वितीय वर्ष यांनी द्वितीय पारितोषिक मिळवत न्यू लॉ कॉलेजचे नाव उंचावले आहे . या विद्यार्थ्यांना कॉलेज चे प्राचार्य श्री . एम .एम तांबे सर आणि प्रा. श्री . पांढरे सर यांनी विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या .
0
3
9
0
6
5