धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे रविवार २७ एप्रिल रोजी दिव्यांगांसाठी विशेष कृत्रिम हात,पाय मोजमाप व तात्काळ वाटप शिबिर

धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे रविवार २७ एप्रिल रोजी दिव्यांगांसाठी विशेष कृत्रिम हात,पाय मोजमाप व तात्काळ वाटप शिबिर
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
धरणगाव :- सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान,जिल्हा प्रशासन,समाज कल्याण विभाग जि.प.जळगाव, एस.आर.ट्रस्ट मध्य प्रदेश व ॲलिम्को यांच्या संयुक्त विद्यमानाने धरणगाव तालुक्यातील दिव्यांगांसाठी विशेष कृत्रिम अवयव मोजमाप व वाटप शिबिराचे आयोजन दिनांक २७ एप्रिल २०२५ रविवार रोजी सकाळी ठीक दहा ते पाच वाजेदरम्यान धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून या ठिकाणी ज्यांना हात पाय नाही अशा दिव्यांगांचे मोजमाप करून जागेवरच जयपूरफूट,कॅलिपर ,हात वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय भाऊसो नामदार. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी येताना दिव्यांगांनी आपले आधार कार्ड रेशन कार्ड दिव्यांग युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र संपर्क मोबाईल नंबर टाकून झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक असून जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कॅम्प समन्वयक मुकुंद गोसावी यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, डॉ.धर्मेंद्र पाटील, डॉ.राहुल मयूर, जिल्हा सामान्य रुग्णालय,जीपीएस परिवार, अरुश्री परिवार,सूर्या फाउंडेशन,मुक्ती फाउंडेशन,बोरसे जी,रुग्णामित्र अविनाश चौधरी आदींचे सहकार्य लाभत आहे.