Breaking
ब्रेकिंग

महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत – सनीभैय्या खरारे

0 3 9 0 7 2

महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत – सनीभैय्या खरारे

एस डब्ल्यु न्यूज / ब्युरो रिपोर्ट

अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी परभणी येथील झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकात्मक प्रतीची विटंबना झाली असून सदर घटनेमुळे आंबेडकरी विचारधारांची अनुयायांच्या भावना खुपच दुखावल्या गेल्या परभणी येथील घटनेचा महाराष्ट्र राज्य व संपूर्ण भारत देशात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटले राष्ट्रीय महापुरुष हे भारत देशाचे धरोवर असून यांचे मानसन्मान करणे आपले कर्तव्य आहे.महापुरुषांचे पुतळे देशवासीयांना सतत प्रेरणा देत असतात. महामानवाच्यां विटंबना करणे ही गोष्ट मानवतेला कलंक लावणारी आहे.तरी अश्या प्रकाराच्या घटना टाळण्यासाठी व समाजकंटकावर एक करडी नजर ठेवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व महापुरुषाच्या पुतळ्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरा लावणे गरजेचे आहे. असे निवेदन अहील्यानगर जिल्ह्यातील मा.पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या बरोबर चर्चा करून देण्यात आले या वेळी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा उपसचिव आकाश ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते अजय सौदे, दिलिप सुर्यवंशी,गोविंद घोडके विकास पंडित,पवन सेवक आदी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे