Breaking
ब्रेकिंग

“अहिल्यानगर छावणी परिषद शाळेचा सर्वांगीण विकास म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण” – डॉ. उद्धव शिंदे

0 8 6 6 6 4

“अहिल्यानगर छावणी परिषद शाळेचा सर्वांगीण विकास म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण” – डॉ. उद्धव शिंदे

अहिल्यानगर : अहिल्यानगर छावणी परिषद शाळेला रक्षा मंत्री उत्कृष्टता २०२५ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांचा शाल व वृक्ष देऊन सन्मानपूर्वक सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, शैक्षणिक, क्रीडा, कला व गुणवत्तावृद्धीच्या विविध उपक्रमांमुळे छावणी परिषद शाळेला देशाचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते रक्षा मंत्री उत्कृष्टता २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही अभिमानाची बाब आहे.
सीएसआर फंडाच्या माध्यमातून शाळेच्या इमारतींच्या आकर्षक व बोलक्या भिंती, रंगरंगोटीमुळे शाळेचे सौंदर्य अधिक खुलले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्कॉलरशिप परीक्षांमध्ये लक्षणीय गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच अद्यावत बालवाटिका व पूर्व-प्राथमिक वर्ग सुरू करून शिक्षणाचा भक्कम पाया घातला आहे.
शाळेत डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, ग्रंथालय, सुसज्ज क्रीडांगण, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, परसबाग, स्काऊट-गाईड उपक्रम राबविण्यात येत आहेत. चित्रकलेतील इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे यश, विविध स्पर्धा, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, तसेच संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश आणि पीएमश्री योजनेतून प्राप्त झालेल्या सुविधांमुळे शाळेचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे.
या सर्व उत्कृष्ट कार्याचा विचार करूनच अहिल्यानगर छावणी परिषद शाळेला रक्षा मंत्री उत्कृष्टता २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे