Breaking
ब्रेकिंग

निंबोडी-नारायणडोहो रस्ता मजबुतीकरण डांबरीकरणासाठी आंदोलन-सरपंच स्वाती बेरड

0 3 9 0 7 2

निंबोडी-नारायणडोहो रस्ता मजबुतीकरण डांबरीकरणासाठी आंदोलन-सरपंच स्वाती बेरड

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

नगर -जवळील निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव, नारायणडोहो हा रस्ता (प्र जि मा १६७) मजबुतीकरण तसेच डांबरीकरण करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय,दरेवाडी च्या वतीने स्वाती सुभाष बेरड यांनी कार्यकारी अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग,अहिल्यानगर यांना पात्र देऊन मागणी केली आहे जर १० दिवसात हा रस्ताचे काम मार्गी लागले नाही तर संबंधीत सर्व गावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे .

निवेदनात म्हटले आहे कि मौजे दरेवाडी ता. जि. अहिल्यानगर येथील निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव, नारायणडोहो हा रस्ता (प्रजिमा १६६) हा रस्ता मजबुतीकरण करणे तसेच डांबरीकरण करण्याचे काम अर्धे अधिक झालेले आहे. राहिलेला रस्ता खूप खराब आहे. तो आपल्या स्तरावर पूर्ण करावाया कामी वेळोवेळी मी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून तोंडी सांगितले आहे तरी आपण या कामी लक्ष घालून आपल्या विभाग मार्फत हा रस्ता पूर्ण करून द्‌यावा व येत्या १०/१२ दिवसात या रस्त्याचे काम चालू करावे अन्यथा मी गावातील नागरिकांसह आपल्या कार्यालयात आंदोलन केले जाईल असे म्हटले आहे .

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे