भेंडा बु . गण स्तरावर कार्यशाळा संपन्न
भेंडा बु . गण स्तरावर कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
भेंडा बु ॥ ग्रामपंचायत सभागृहामध्ये दि १० डिसेंबर रोजी गण स्तरावर भेंडा बु , भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगाव, दिघी, नजिक चिंचोली, शहापूर आदी गावांचे सरपंच, ग्रामसेवक,ग्रा सदस्य, स्वयं साह्यता बचत गटाचे प्रतिनिधी आदींना या कार्य शाळेत मार्गदर्शन करण्यात आले .
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य सन २०२ ५ – २६ अंतर्गत आमच गाव आमचा विकास आराखडे तयार करण्यासाठी दि १० डिसेंबर रोजी भेंडा बु येथे एक दिवशीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्य शाळे स प्रभारी अधिकारी म्हणून नेवासा पं स चे विस्तार अधिकारी – संतोष कदम यांनी मार्गदर्शन केले यामध्ये सन 2025 – 26 चा विकास आराखडा तयार करणेसाठी बंधीत व अबंधीत निधी व घ्यावया ची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून नऊ थिम व सतरा शाश्वत विकासाचे ध्येय या संदर्भात योग्य मार्गदर्शन केले .
यावेळी व्यासपिठावर गणेशराव गव्हाणे,भेंडा बु चे सरपंच – सौ रोहिणी नामदेव निकम, उपसरपंच – सौ संगिता नामदेव शिंदे, देवगावच्या सरपंच सौ कांताताई तागड, भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष – नामदेव निकम, माजी उपसरपंच – पंढरीनाथ फुलारी, येडुभाऊ सोनावणे, देवेंद्र काळे, मेजर विजय काळे, ग्रामसेवक – रेवन्नाथ भिसे, नरसाळे भाऊसाहेब, घाणमोडे भाऊसाहेब, नजन भाऊसाहेब बचत गटाच्या प्रतिनिधी – कांचन सावंत, सर्व अंगणवाडी सेविका, विष्णु फुलारी, बाबासाहेब गोर्डे, रामभाऊ देशमुख आदी उपस्थित होते .