Breaking
ब्रेकिंग

कृषी विभागा अलिबाग तालुक्यामार्फत वनराई वळण बंधारे वेलोशी गावात

0 3 9 0 3 2

कृषी विभागा अलिबाग तालुक्यामार्फत वनराई वळण बंधारे वेलोशी गावात

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे

अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावांमधील वनराई वळण बंधारे बांधण्यासाठी अलिबाग तालुका कृषी अधिकारी माननीय श्री तन्मयजी भगतसाहेब, नागाव मंडळ कृषी अधिकारी मा.श्री मोहनजी सूर्यवंशी साहेब, चौल विभाग कृषी पर्यवेक्षक श्रीमती जमादार मॅडम, बेलोशी विभाग कृषी सहाय्यक अधिकारी मा.श्री.मिसाळसाहेब, थळ विभाग कृषी सेवक मा.श्री.टकले साहेब, कृषी सेवक रामराज विभाग श्रीमती बोऱ्हाडेमॅडम, येऊन स्वतः श्रमदानाने व बेलोशीतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन वनराई बंधारा बांधला .

त्यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा ओबीसी सरचिटणीस मा.श्री. अशोकजी वारगेसाहेब, माजी उपसरपंच बेलोशी ग्रामपंचायत मा.श्री. सदानंदजी थळेसर, मा ग्रामपंचायत सदस्य श्री सुशील पाटीलसाहेब, बेलोशी शेतकरी मा श्री जयवंतजी वारगे,मा. श्री. समिरजी वारगे, मा. श्री. मंगेशजी नाईक व इतर शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्याची प्रात्यक्षिक दाखवले त्यामुळे नदीतील पाणी अडून नदी बाजूला शेतकऱ्याला त्याचा शेतमळा, फळपीक लागवड, आंबे चिकू,लागवडी व इतर पिक लागवड साठी पाण्याची उपलब्धता करून दिली त्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी सदर कृषी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे