दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पकडल्या दहा गाड्या ; मुलांच्या पालकांना बोलवून पोलिसांनी दिली समज

दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पकडल्या दहा गाड्या ; मुलांच्या पालकांना बोलवून पोलिसांनी दिली समज
राहुरी अहमदनगर वृत्तसेवा : जावेद शेख
राहुरी तालुक्यातील शिवाजी चौकात सायंकाळी 6.00 ते 6.15 दरम्यान अल्पवयीन मुले गाडी चालवत असलेल्या गाड्या तपासणीची मोहीम राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केली.
त्यावेळी केवळ पंधरा मिनिटात सुमारे दहा अल्पवयीन मुले गाडी चालवताना आढळून आली.
सदर अल्पवयीन मुलांकडे गाडी चालवण्याचा परवाना असण्याचा प्रश्नच नसल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन पहिली वेळ असल्याने त्यांच्याकडून भविष्यात पालक सदर अल्पवयीन मुलांना गाडी देणार नाही अशी लेखी घेऊन सदर गाड्या अल्पवयीन मुलांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या.
सदर प्रकारची मोहीम ही राहुरी पोलीस स्टेशन कडून यापुढेही सुरू राहणार आहे तरी सुज्ञ नागरिकांनी आपल्या पाल्यांना त्यांचे वय पूर्ण झाल्याशिवाय व त्यांच्याकडे लायसन्स असल्याशिवाय गाड्या चालविण्यासाठी देऊ नये, कारण अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचं प्रमाण अतिशय जास्त असून प्राणांतिक अपघातामध्येही तरुणांची संख्या खूप जास्त आहे. तरी अल्पवयीन मुलांकडे गाड्या चालविण्यासाठी देऊ नये असे आव्हान राहुरी पोलिसांकडून करण्यात येते.